मजकुराकडे जा
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण मंडळफोंडा, गोवा
लेख

ती

लेखक: वैभवी दिलीप प्रभू · १६ नोव्हेंबर, २०२६ · 1 मिनिटे वाचन

समाजातील महिला एकत्र हसताना

ती, कधी स्वतःच दुःख बाजूला ठेवून हसणारी “आई”

ती, कधी समजावणारी शाळेतली “बाई”

ती, कधी हक्काने ओरडणारी “ताई”

तर ती कधी प्रेम दाखवणारी मैत्रीण असते

आजच्या जगात वावरताना आपण बघू शकतो की ती कुणापेक्षा कमी नाहीये तर ती सगळी काम सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित रूपे पार करून आपलं घरही व्यवस्थित रीतीने सांभाळते.

कितीतरी वेगवेगळ्या भूमिका ती निभावते सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन नेहमी आपला हसरा चेहरा ती सगळ्यांसमोर दाखवते दुसऱ्यांना सुखी ठेवण्यात घरच्यांना आनंदी ठेवण्यात त्यांच्या आवडीनिवडी जपण्यात तिचा हात कोणीच कधीच धरू शकत नाही.

तिलाच का?

एवढं असूनही नेहमी तिलाच का बरं सगळं ऐकावं लागतं? तिलाच का सगळ्या प्रश्नांना सामोरे जावं लागतं? असे अनेक प्रश्न अनेकदा समाजातील कृती बघून आपल्या मनात येतात आणि काही क्षणात आपण त्यांना आपल्या मनातून काढूनही टाकतो तर असे हे येणारे विचार किंवा प्रश्न आपल्या मनात न ठेवता त्यांचा योग्य रीती विचार करून आपल्या आचरणात जर आपण आणले तर नक्कीच आपण हे कोडे सोडवू शकतो

आपण काय करू शकतो

घरातील तिचा ताण थोडा कमी करण्याकरिता तिला जरा हातभार लावणे किंवा शांतपणे तिचे विचार ऐकण्यात आपला थोडा किमती वेळ घालवणे तिच्या दृष्टीकोनातून जरा आपण विचार करणे, तिच्या पाठीमागे आपण सदैव उभे आहोत ह्याची तिला जाणीव करून देणे ह्या आपल्या छोट्या छोट्या कृत्याने पण तिचा भार नक्कीच कमी होऊ शकतो.

ज्या दिवशी आपण मनातून स्त्री या शब्दाचा आदर आणि सन्मान करायला सुरुवात करू अर्थात त्याच दिवसापासून महिला वरचा कितीतरी ताण आणि तणाव कमी होईल आणि त्यांना येणाऱ्या संकटांना समोरी जाण्याचा बळ मिळेल.

अशा या आजच्या जगात वेगवेगळे भूमिका योग्य रीतीने मावणाऱ्या प्रत्येक महिलेला माझा नमस्कार.

शेअर करा: व्हॉट्सॲप फेसबुक

लेख मधील आणखी लेख

लग्नात एकमेकांचा हात धरलेले वधूवर
लेख

निवड जोडीदाराची

लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १८ नोव्हेंबर, २०२६

लग्न जमवणे आणि टिकवणे आज कठीण का झाले आहे, आणि जोडीदार निवडताना पैशापेक्षा स्वभाव आणि जिद्द का महत्त्वाची, याबद्दलचा लेख.

स्त्रीच्या कपाळावर लावलेली लाल टिकली
लेख

आपली हिंदू संस्कृती - टिकली

लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १७ नोव्हेंबर, २०२६

कपाळावरची टिकली हा आपल्या संस्कृतीचा एक छोटासा पण महत्त्वाचा भाग आहे. ती जपणे का गरजेचे आहे, याबद्दलचे एक मनोगत.