आपली हिंदू संस्कृती - टिकली
लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १७ नोव्हेंबर, २०२६ · 1 मिनिटे वाचन

आपल्या हिंदू संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला अगदी लहान असल्यापासून अंगीकारण्यास आवडतात. जसे की, देवीदेवतांची पुजा, प्रार्थना करण, देवळात जाण, भजनकिर्तनात रंगून जाण, बायकांच साडी न्हेसण, बांगड्या हातभर घालण अशा अनेक त्यातीलच एक म्हणजे बायकांच कपाळावर टिकली लावण.
पूर्वीची टिकली
पूर्वीच्या काळात मुली असो वा बायका त्यांच्या कपाळावर टिकली नाही अशी एकही बाई शोधून सापडली नसती. टिकली म्हणजे आपल्या संस्कृतीचाच एक भाग.
सर्व बायका लाल रंगाचीच टिकली लावायच्या, काही मुली कलरच्या तर काही लाल, मरुन कलरच्या टिकल्या लावायच्या आणि त्याही इतरांना दिसतील अशा.
काहीजणीतर गंधाने कपाळावर मोठ्ठाली टिकली काढायच्या.
त्या काळात जास्त रंगरंगोटीचे सामान नव्हते पण तरीही अंगावरची साडी, हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली स्त्रीच्या सौंदर्याला चार चाँद लावायचे.
आजची टिकली
आता मात्र जसजसे आपण प्रगती करतोय तसतसे आपल्या संस्कृतीपासून दूर जातोय असे वाटते. ही टिकलीची प्रथा हळूहळू कालबाह्य होणार असे दिसते आहे. थोड्याफार प्रमाणात टिकली लावणारी बायका मुली दिसतात मात्र बायकांच्या कपाळावरील टिकली मॅचिंग असते आणि एवढी छोटी असते की, टिकली लावणारी जवळ आली तरच ती आपल्याला दिसू शकते.
काहीजणी म्हणतील तो आमचा प्रश्न तुझ काय जात आम्ही आम्हाला पाहिजे तस वागू. पण मी कुठे म्हणते तुम्ही माझ्या म्हणन्याप्रमाणे वागा. माझ केवळ एवढच म्हणनं आहे की, जर आपण हिंदू असून आपल्याला आपली संस्कृती जपण जमत नसेल तर काय उपयोग आहे. आपली संस्कृती जतन करन आपल कर्तव्य आहे आणि आपण ती जपली तरच पुढची पीढीही आपल्या पावलावर पाऊल ठेवून ती टिकवण्याचा प्रयत्न करेल.
आपल्या हिंदू धर्मातच ही टिकलीची संकल्पना फार पुर्वी पासून आहे बाकी कुठल्या धर्मात ती लावली जाते हे मला तरी माहीत नाही. मागे माझ्या कुठेतरी वाचनात आल होत की टिकलीचा आरोग्याशीही संबध आहे आता आठवत नाही. तुम्ही कितीही मेकअप करा, उंची उंची पेहराव करा पण एक टिकली कपाळावर नसेल तर तुमच्या सौंदर्यात काहीतरी कमी असल्यासारखे वाटते. आपणच आपल्या हिंदू धर्माचा अभिमान राखला पाहिजे तरच इतरही त्याचा अवमान करताना दहा वेळा विचार करतील.
लेख मधील आणखी लेख

निवड जोडीदाराची
लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १८ नोव्हेंबर, २०२६
लग्न जमवणे आणि टिकवणे आज कठीण का झाले आहे, आणि जोडीदार निवडताना पैशापेक्षा स्वभाव आणि जिद्द का महत्त्वाची, याबद्दलचा लेख.

